Fake Remdesevir : वर्षभरापासून रेमडेसिविरच्या नावानं बाटलीत खारट पाणी भरून विकत होता, समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:46 PM2021-04-20T17:46:58+5:302021-04-20T17:53:58+5:30

Fake remdesevir : मागील वर्षापासून आपल्या सहकाऱ्यांसमवेत हे काम करीत आहे. त्याच्या साथिदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

CoronaVirus Remdesevir News : Fake Remdesevir mysuru nurse arrested | Fake Remdesevir : वर्षभरापासून रेमडेसिविरच्या नावानं बाटलीत खारट पाणी भरून विकत होता, समोर आला धक्कादायक प्रकार

Fake Remdesevir : वर्षभरापासून रेमडेसिविरच्या नावानं बाटलीत खारट पाणी भरून विकत होता, समोर आला धक्कादायक प्रकार

Next

देशात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे.  गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांचे उपचार  करण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर रिकव्हर करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून रेमडेसिविरचा काळा बाजार, साठेबाजी अश्या मुद्द्यावरून जनसामान्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. कर्नाटकातून आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

म्हैसुरच्या रुग्णालायतील एक नर्स इंजेक्शनच्या लहान बाटलीत खारट पाणी आणि एंटीबायोटिक मिसळून विकत असल्याचा खुलासा  करण्यात झाला आहे.  या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी  तक्रार नोंदवली असून दोषींना अटक केली आहे.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोपीकडे या जीवनरक्षक औषधाची मागणी वाढली.  त्यानंतर म्हैसूर पोलिसांना रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराची माहिती मिळाली. ही कारवाई झाल्यानंतर म्हैसूरचे पोलिस आयुक्त चंद्रगुप्त यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. 

प्रेमात ती म्हणेल ते करायला गेला; रेमडेसीवीरमुळे नर्सचा प्रियकर अडचणीत आला

या ब्लॅक मार्केटिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार गिरीश नावाचा एक माणूस होता जो पेशाने नर्स आहे. पोलिस आयुक्त चंद्रगुप्त म्हणाले, "विविध कंपन्यांकडून रेमेडिसवीरच्या बाटल्या रिसायकल करून त्यांना एंटीबायोटिक आणि खारट पाण्यानं भरले गेले आणि बाजारात आणले गेले. हा माणूस २०२० पासून हे दुष्कृत्य करत होता. आम्ही या रॅकेटची अधिक चौकशी करत आहोत आणि त्याने विक्री आणि पुरवठा कुठे, कुठे केला होता याचाही तपास केला जात आहे."

मुंबई पोलिसांनी २ हजार २०० रेमडीसीवीर इंजेक्शन्स केली जप्त

आरोपी गिरीशने हा खुलासा केला आहे की तो मागील वर्षापासून आपल्या सहकाऱ्यांसमवेत हे काम करीत आहे. त्याच्या साथिदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. JSS रुग्णालयात गिरीश स्टाफ नर्स म्हणून काम करत होता.

Web Title: CoronaVirus Remdesevir News : Fake Remdesevir mysuru nurse arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.