Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:49 PM2021-05-08T20:49:37+5:302021-05-08T20:49:57+5:30

Remadesivir racket exposed: रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे.

Coronavirus: Remadesivir black market racket exposed, LCB cracks down the racket | Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग

Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग

Next

यवतमाळ - रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे. हाच धागा पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबमधील एका वादग्रस्त डॉक्टरच्या मेडिकलवर फंटर पाठविला. सुरुवातीला तीन इंजेक्शन व नंतर सहा असे नऊ इंजेक्शन खरेदी करण्यात आले. यात पोलिसांनी रंगेहात चौघांना अटक केली. यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

कळंबमधील वादग्रस्त डॉ. अक्षय तुंडलवार यांच्या मेडिकलमधून रेमडेसिविरची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यावरून एलसीबीने एक डमी ग्राहक पाठवून तेथे रेमडेसिविरची मागणी केली. सुरुवातीला ३६ हजारात तीन इंजेक्शन खरेदीचा व्यवहार ठरला. या प्रमाणे मेडिकल स्टोअर्समधील सावंत पवार याने कळंबमधील छत्रपती शिवाजी महाराज उडाण पुलाखाली तीन इंजेक्शन काढून दिले. दबा धरुन असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. डॉ. अक्षय तुंडलवार यालाही ताब्यात घेतले. बाजीरावचा हिसका दाखवताच त्यात कळंब कोविड केअर सेंटरवर कार्यरत असलेला कंत्राटी परिचारक सौरभ मोगरकर याने हे इंजेक्शन पुरविल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ सौरभला ताब्यात घेऊन आणखी सहा इंजेक्शनची मागणी करायला लावली. त्याने यवतमाळातील जाजू चौक स्थित एका महिलेकडून सहा रेमडेसिविर पुन्हा बोलावून दिले.

पोलीस पथकाने लागलीच त्या महिलेला अटक केली. काही तासाच्या कारवाईत रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या डॉ. अक्षय तुंडलवार रा. कळंब, मेडिकल स्टोअरवरील कर्मचारी सावंत पवार, आरोग्य परिचारक सौरभ मोगरकर आणि जाजू चौक येथील ५७ वर्षीय महिला यांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ रेमडेसिविर जप्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे,स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी व कर्मचाऱ्यांंनी ही कारवाई केली.
 
शासकीय कोविडवर संशयाची सुई
रुग्णांना दिले जाणारे डोस न लावता ते बाहेर विक्रीला आणले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. आरोग्य कर्मचारी असलेला सौरभ मोगरकर हा यवतमाळ येथील रुग्णालयातही काही दिवस कार्यरत होता. तर ज्या महिलेने रेमडेसिविर पुरविले तिची मुलगीही नागपूरमध्ये परिचारिका असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे इंजेक्शन नेमके आणले काेठून याचा शोध पोलीस घेत आहे. प्रथमदर्शनी शासकीय कोविडवरच संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Coronavirus: Remadesivir black market racket exposed, LCB cracks down the racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.