Coronavirus : हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 21:13 IST2021-04-28T21:12:18+5:302021-04-28T21:13:03+5:30
Coronavirus : ही इंजेक्शन्स 20 ते 25 हजार रुग्णांच्या नातेवाईकांना रुपयांना विकली जात होती.

Coronavirus : हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला जप्त
कोरोनाच्या उपचारात रामबाण औषध ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार अद्यापही सुरुच आहे. मुंबईसह देशभरात रेमडेसिविरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचं दिसत आहे. मुंबईत गुन्हे शाखेने अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या कक्ष 12 ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या मोतीलाल नगर परिसरात लिंक रोडनजीक एका हॉटेलच्या किचनमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स दडवून ठेवण्यात आली होती. ही इंजेक्शन्स 20 ते 25 हजार रुग्णांच्या नातेवाईकांना रुपयांना विकली जात होती.
पोलिसांनी धाड टाकली तेव्हा हॉटेलच्या किचनमध्ये 34 रेमडेसिविर इंजेक्शन्स आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुजरातमधून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून ही टोळी मुंबईत ती चढ्या भावाने विकत होती.