Coronavirus: Otherwise face severe action, Mumbai police warned to markaj pda | Coronavirus : अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जा, मुंबई पोलिसांनी दिला इशारा

Coronavirus : अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जा, मुंबई पोलिसांनी दिला इशारा

ठळक मुद्देआयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

मुंबई - दिल्लीतील मरकजहून आलेल्यांनी स्वतः पुढे यावे असे मुंंबई पोलिसाांनि आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलिग़ी जमात मरकजमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे.

असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे जे मरकजहून आलेले जे कोणी आरोग्य तपासणीस सहकार्य करत नसतील त्यांना मुंबई पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

Web Title: Coronavirus: Otherwise face severe action, Mumbai police warned to markaj pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.