CoronaVirus News : इंजेक्शनची काळाबाजार करणाऱ्या महिलेला दोन दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 19:20 IST2020-07-25T19:19:47+5:302020-07-25T19:20:32+5:30
CoronaVirus News : एफडीएचे अधिकारी महिलेची सखोल चौकशी करीत असून यामागे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता विभागाचे अधिकारी नितीन भारद्वाज यांनी दिली आहे.

CoronaVirus News : इंजेक्शनची काळाबाजार करणाऱ्या महिलेला दोन दिवसाची पोलीस कोठडी
उल्हासनगर - कोरोनावर गुणकारी ठरलेल्या अॅक्टेमरा टोसिलीजुमॅब इंजेक्शनची काळाबाजार करणाऱ्या महिलेला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली. एफडीएचे अधिकारी महिलेची सखोल चौकशी करीत असून यामागे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता विभागाचे अधिकारी नितीन भारद्वाज यांनी दिली आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या ६ हजार पेक्षा जास्त झाली असून कोरोनावर गुणकारी ठरलेल्या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यातूनच इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. कॅम्प नं-३ मनीषनगर परिसरात राहणारी सेवानिवृत्ती एक शिक्षिका अॅक्टेमरा टोसिलीजुमॅब इंजेक्शनची काळाबाजार करीत असल्याची माहिती औषध व अन्न प्रशासन विभागाच्या निशिगंधा पाष्टे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने निता पंजवाणी यांच्या घरावर गुरवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान धाड टाकून सिपला कंपनीचे अॅक्टेमरा टोसीलीझुमॅब हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकताना रंगेहाथ अटक केली. ४०,५४५ किंमतीचे इंजेक्शन तब्बल ६० हजार रुपयांना विकत असल्याचे उघड असून यामागे मोटे रॅकेट असल्याचा संशय एफडीए अधिकारी यांनी व्यक्त केला.या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्या निती पंजवणी यांना एफडीए अधिकाऱ्यांनी न्यायालया समोर उभे केले असता, न्यायालयाने दोन दिवसाची कस्टडी दिली. इंजेक्शन काळ्याबाजार यामागे रॅकेट कार्यरत आहे का?. या दृष्टिकोनातून मध्यवर्ती पोलिस व एफडीएचे अधिकारी तपास करीत आहे. आतापर्यंत महिलेकडे कोणतेही औषध, इंजेक्शन व इतर माहिती मिळाली नसल्याची माहिती विभागाचे अधिकारी नितीन भारद्वाज यांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत