Coronavirus : ड्रोनसह इतर उड्डाणांवर महिनाभर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 19:21 IST2020-03-21T19:19:59+5:302020-03-21T19:21:43+5:30
Coronavirus : येत्या गुरुवार २६ मार्चपासून ते २४ एप्रिलपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

Coronavirus : ड्रोनसह इतर उड्डाणांवर महिनाभर बंदी
मुंबई - महानगरासह राज्यातील सर्व नागरिक कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंधासाठी सज्ज झाले असताना या कालावधीत ड्रोनसह एअर मिसाईल व अन्य खेळणी अवकाशात उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या गुरुवार २६ मार्चपासून ते २४ एप्रिलपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत त्याचे सर्वाधिक रुग्ण सापडले असल्याने सर्व शासकीय यंत्रणा त्याचा अटकाव करण्याच्या प्रयत्नात आहे. पोलिसांकडूनही त्यासाठी उपाय योजना राबविल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर आकाशात रॉकेट, ड्रोन व अन्य उपकरणे उडविण्याला मनाई करण्यात आली आहे. मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट उडविण्याला पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी मनाई आदेश काढला आहे.