शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

Coronavirus Lockdown : राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:20 IST

Coronavirus Lockdown : सोमवारी  पहाटे चार वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ४० हजार २४२ गुन्हे नोंद झाले आहेत.

ठळक मुद्देपुणे शहर(५१७८), सोलापूर शहर(३१९८ ), अहमदनगर(३७३९),  पिंपरी चिंचवड (३२८४) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ६५ हजार ५४५ तक्रारी समोर आल्या.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड़ सुरु असताना गेल्या २१ दिवसांत २६ हजार ७४७ वाहने जप्त करण्यात आली आहे. तर १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोमवारी  पहाटे चार वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ४० हजार २४२ गुन्हे नोंद झाले आहेत. यात पुणे शहर(५१७८), सोलापूर शहर(३१९८ ), अहमदनगर(३७३९),  पिंपरी चिंचवड (३२८४) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. याच काळात राज्यभरात ५०९ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’च्या आदेश धुडकावले. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले.याच काळात अवैध वाहतूक प्रकरणी ९६८ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३०९६ जणांना अटक करण्यात आली. याच काळात २६ हजार ७४७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. नागरिक विनाकारण बाहेर पड़त असल्याने पोलिसांना कठोर पावले उचलावी लागत आहेत. तर पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ६५ हजार ५४५ तक्रारी समोर आल्या. यातील बहुतांश तक्रारी या कोरोना संशयित तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी संदर्भातील आहेत.मुंबईत ५ हजार गुन्हे मुंबईत २० मार्च ते १२ मार्च पर्यन्त ५ हजार ३२१ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविन्यात आले असून २१५ जणांना अटक करत त्यांना जामिनावर सोडण्यात आले. तर ६६ जणांना नोटीस देत सोडण्यात आले आहेत.सोसायटयामध्येही गस्त वाढवलीमुंबईत अनेक सोसायटयांमध्ये रात्रीच्या सुमारास गप्पाच्या मैफ़ीली भरत असल्याचे चित्र आहे. अशात पोलिसांनी अशा सोसायटयामध्येही गस्त वाढवली आहे. त्यामुळे पोलिसांची गाड़ी येताच अनेकांची पळापळ होत असल्याचे पहावयास मिळते आहे. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईPuneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर