coronavirus: अत्यावश्यक पासचा दुरुपयोग करत गुटख्याची वाहतूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:47 IST2020-05-14T02:47:14+5:302020-05-14T02:47:48+5:30
अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखाविक्रीसाठी आणणाऱ्या एकाचा टेम्पोसह गाशा गुंडाळण्यात पोलिसांना यश आले.

coronavirus: अत्यावश्यक पासचा दुरुपयोग करत गुटख्याची वाहतूक!
मुंबई : वाहनावर शासनमान्य वस्तूंची वाहतूक करत असल्याचा अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखाविक्रीसाठी आणणाऱ्या एकाचा टेम्पोसह गाशा गुंडाळण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी साकीनाका परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने केली.
आकाश गुप्ता (२८) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो साकीनाक्याच्या मोहाली व्हिलेजचा राहणारा आहे. अत्यावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाकडून काही लोकांना तात्पुरत्या स्वरूपात विशेष पास उपलब्ध करून दिले आहेत. मात्र त्याचा गैरवापर करत गुटखाविक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती कक्ष १०चे प्रमुख सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने साकीनाक्यात सापळा रचत एकाला टेम्पोसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा ३ लाखांच्या टेम्पोसह हस्तगत करण्यात आला.