Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमविरोधात कारवाई सुरूच, ३९५ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 05:08 PM2020-05-18T17:08:17+5:302020-05-18T17:12:38+5:30

Coronavirus : महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

Coronavirus: Cyber crime's action continues during lockdown, 395 cases registered pda | Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमविरोधात कारवाई सुरूच, ३९५ गुन्हे दाखल

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमविरोधात कारवाई सुरूच, ३९५ गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ३९५ गुन्ह्यांची (ज्यापैकी १७ N.C आहेत) नोंद १७ मे २०२० पर्यंत झाली आहे.सध्या लॉकडाउनच्या काळात ८-१७ या वयोगटातील मूले, स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करत आहेत.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  


महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ३९५ गुन्ह्यांची (ज्यापैकी १७ N.C आहेत) नोंद १७ मे २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २११ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

 

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

 

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 

 

खळबळजनक! पालघरमध्ये एका तासात सापडले दोन मृतदेह  


हिंगोली  जिल्ह्यातील कुरुंडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ७ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिकतेचा  रंग देणारा  टिकटॉक विडिओ बनवून , सदर विडिओ विविध सोशल मिडियावरून प्रसारित केला आहे ,त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. सध्या लॉकडाउनच्या काळात ८-१७ या वयोगटातील मूले, स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करत आहेत.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेषतः पालकांना विनंती करते कि, कृपया आपले पाल्य ऑनलाईन काय व कोणती वेबसाईट्स सर्फ करतात यावर लक्ष ठेवा .त्यांना ऑनलाईन कोणी काही फसवत नाही आहे. याची खबरदारी घ्या. शक्यतो आपल्या ऑफिसचा लॅपटॉप वा मोबाईल आपल्या पाल्यास हाताळायला देऊ नका. तसेच जर कोणी आपल्या पाल्यास ऑनलाईन फसवत असेल किंवा त्रास देत असेल व आपल्या पाल्याने जर आपणास हे सांगितले तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये ताबडतोब द्या व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा. लॉकडाउनबाबत फक्त राज्य व केंद्र सरकार अधिकृतरित्या जी माहिती व नियमावली वेळोवेळी प्रसिद्ध करतील त्यावरच विश्वास ठेवा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका  असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेलने केले आहे.

Web Title: Coronavirus: Cyber crime's action continues during lockdown, 395 cases registered pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.