शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

Coronavirus : लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 17:59 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने काहि दिवसांपासुन व्यवसाय बंद असल्याने ते गेल्या काहि दिवसांपासून चिंताग्रस्त अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

ठळक मुद्दे नातेवाइकांच्या दिलेल्या माहितीनुसार ,संतोष पाटील यांचा टेन्ट हाऊस चा व्यवसाय होता. शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संतोष पाटील झोपेतून उठले. आंघोळीसाठी त्यांनी पाणी गरम करण्यासाठी ठेवले.

जळगाव :  शहरातील ज्ञानदेवनगर परिसरात  मंडप व्यावसायिक  संतोष रामदास पाटील ( माळी) वय ४० यांनी राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने काहि दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने ते गेल्या काहि दिवसांपासून चिंताग्रस्त अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

व्यवसाय बंद असल्याने होते चिंताग्रस्तनातेवाइकांच्या दिलेल्या माहितीनुसार ,संतोष पाटील यांचा टेन्ट हाऊस चा व्यवसाय होता. लग्न समारंभ, सत्कार यांच्यासह विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी ते मंडप, गाद्या, भांडे  इत्यादी साहित्य तसेच सुविधा पुरवीत असायचे. त्याच्यावरच ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान कोरोनो व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उद्योग, व्यवसाय, कंपनी इत्यादी ठिकाणी काम थांबले आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय ही बंद होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून संतोष पाटील (माळी) हे चिंताग्रस्त  होते.  मुलीलाच दिसला गळफास घेतलेल्या अवस्थेत पिताशुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संतोष पाटील झोपेतून उठले. आंघोळीसाठी त्यांनी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. दरम्यान  रिंग वाजल्याने मोबाईल सोबत घेऊन वरच्या मजल्यावर गेले. बराच वेळ झाल्यानंतरही ते खाली न आल्याने त्यांची मुलगी प्रियंका ही त्यांना बोलविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता तिला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. यांनतर तिने हंबरडा फोडला अन् आरडाओरड केली त्यानंतर हा प्रकार समोर आला. कुटूंबातील व्यक्तींना या घटनेमुळे जबर धक्का बसला. गल्लीतील महिला नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच संतोष यांचे मोठे बंधू राजेंद्र पाटील, लहान बंधू किशोर पाटील यांच्यासह कुटूंबातील सदस्य असोदा येथून घटनास्थळी आले. तत्पूर्वी संतोष यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता डाँक्टरानी मृत घोषित केले.

अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

 

मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड; बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या

 

सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात

पोलिसात अकस्मात मृत्युची नोंदसंतोष यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगी प्रियंका, मुलगा गौरव, आई,वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. मृत संतोष हे मनमिळावू व कोणाच्याही मदतीला धावून जात असायचे. त्यांच्या अकस्मात मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिसbusinessव्यवसाय