शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनमध्ये नियम मोडून काढली वरात, वरासह वऱ्हाडी पोहोचले थेट तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 13:41 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घातलेले असतानाही एका कुटुंबाने बँडबाजासह काढली वरात वरातीमध्ये सामील झालेल्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे मास्क, सोशल डिस्टंसिंग यांसारखे कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय केले नव्हतेया वरातीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई केली

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्या देशात सध्या गंभीर रूप धारण केले आहे. त्यातही मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घातलेले असतानाही एका कुटुंबाने बँडबाजासह जोरात वरात काढली. याप्रकरणी वरासह अन्य काहीजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबाने पोलिसांची परवानगी न घेता वरात काढली होती. तसेच वरातीमध्ये सामील झालेल्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे मास्क, सोशल डिस्टंसिंग यांसारखे कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय केले नव्हते.  

या वरातीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई केली. पोलिसांनी वर आणि ९ वऱ्हाड्यांवर कारवाई केली आहे. तसेच या वरातीसाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार आणि बँड पार्टीवरसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. या वरातीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक कोरोनाचे भय विसरून सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडून नाचताना दिसत आहेत.  

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे गंभीर संकट निर्माण झालेले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहे. तसेच शनिवारीसुद्धा राज्यामध्ये कोरोनाचे ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले होते. तर शनिवारी राज्यात ११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ८३० एवढी झाली आहे.   

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी