Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:12 IST2020-05-04T22:08:15+5:302020-05-04T22:12:58+5:30

Coronavirus : १८ जण हे ५५ वयोगटावरील असल्याने त्याना रजेवर पाठविण्यात आले आहे.

Coronavirus: 12 cops infected with JJ Marg police station pda | Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण 

Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण 

ठळक मुद्दे आता जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. ६ पोलीस अधिकारी आणि ४० पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबई - कोरोनाविरोधात लढण्यासाठी मैदानात खाकीतले हिरो आणि आरोग्य सेवक उतरले आहेत. राज्यात ३८५ पोलीस कर्मचारी कोरोनाबधित असून त्यापैकी 35 पोलीस अधिकारी तर 350 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ६ पोलीस अधिकारी आणि ४० पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. १८ जण हे ५५ वयोगटावरील असल्याने त्याना रजेवर पाठविण्यात आले आहे. 

 

कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. जे जे मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हे सगळे पोलीस कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

 

आतापर्यंत राज्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी कोरोनावर मात करण्यासाठी आपण घरीच राहून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. 

 

Web Title: Coronavirus: 12 cops infected with JJ Marg police station pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.