कोरोनाबाधीत रुग्णाची आत्महत्या, आयसोलेशन वॉर्डाच्या बाथरुममध्ये लावला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:48 PM2020-08-17T15:48:11+5:302020-08-17T15:54:06+5:30

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. यामुळे आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Corona infected patient committed suicide, hangs himself in isolation ward bathroom | कोरोनाबाधीत रुग्णाची आत्महत्या, आयसोलेशन वॉर्डाच्या बाथरुममध्ये लावला गळफास

कोरोनाबाधीत रुग्णाची आत्महत्या, आयसोलेशन वॉर्डाच्या बाथरुममध्ये लावला गळफास

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील देव्हाडा बुज. येथील ५० वर्षीय व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षण असल्याने भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते.

भंडारा : कोरोनाबाधीत एका ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. तो बाथरुममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


तुमसर तालुक्यातील देव्हाडा बुज. येथील ५० वर्षीय व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षण असल्याने भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तो रुग्णालयात दाखल झाला तेव्हापासून तणावात असल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळी कोरोना वॉर्डातील एक व्यक्ती बाथरुमला गेले असता त्याला ५० वर्षीय व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. यामुळे आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाने महिलेचा मृत्यू
भंडारा तालुक्यातील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत मृतांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही अलीकडे वाढ होत आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

Web Title: Corona infected patient committed suicide, hangs himself in isolation ward bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.