शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

संतापजनक! कोरोना बाधिताला सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणं पडलं महागात, गुन्हा दाखल    

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 20:39 IST

पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

ठळक मुद्देसमाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोरोना बाधिताविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी लाल साहेब चौक, कादर चौक, टिमकी, मोमिनपुरा आणि भगवाघर चौक हा परिसर सील केला.

नागपूर - रुग्णालयातून उपचार झाल्यानंतर घरी पोहोचलेल्या एका कोरोना बाधिताने सामाजिक वातावरण दूषित करू पाहणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोरोना बाधिताविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  हा व्यापारी असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. टोपी विकण्याचा व्यवसाय करणारा कोरोनाबाधित १३ मार्चला दिल्लीला गेला होता. तेथून माल खरेदी करून तो १५ मार्चला नागपुरात आला. त्याची दिल्ली ट्रॅव्हल हिस्ट्री कळाल्यानंतर त्याला एमएलए हॉस्टेल नागपूर येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. ४ तारखेला तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दरम्यान, त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबातील ७ आणि आजूबाजूला राहणाऱ्या, संपर्कात आलेल्या ३९ व्यक्तींनाही क्वारंटाईन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी लाल साहेब चौक, कादर चौक, टिमकी, मोमिनपुरा आणि भगवाघर चौक हा परिसर सील केला. 

दरम्यान, उपचार करून त्याला शुक्रवारी रात्री सुट्टी देण्यात आली. कोरोनाबाधित रात्री घरी पोहोचला आणि काही वेळातच त्यांनी उपद्रव सुरू केला. स्वतःचे डिस्चार्ज रिपोर्ट त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. आपल्याला काहीच झाले नव्हते. जबरदस्तीने आपल्याला क्वारंटाईन करण्यात आल्याचा कांगावा त्याने सुरू केला. 

शनिवारी सकाळी हा प्रकार कळाल्यानंतर त्याच्या उपद्रवाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांनी तहसील पोलिसांकडे धाव घेत त्या उपद्रवीविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर यांनी त्या उपद्रवीविरुद्ध भादवीच्या कलम १८८,१८६, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम ३ नुसारशनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलिसांचे पथक पुन्हा जमिरुलच्या घरी धडकले. वृत्त लिहिस्तोवर त्या इसमाला ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू होती.यापूर्वीही केला उपद्रवआरोपी इसमाने त्याला क्वारंटाईन करून एमएलए हॉस्टेलच्या अलगीकरण कक्षात ठेवले असता तो तिथेही उपद्रव करीत होता. त्याने मोबाईलवरून अनेकांचे फोटो काढले. शिवाय इकडे तिकडे तो फिरत होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तेथील व्यवस्था चांगली नसल्याच्या तक्रारी करूनही त्याने प्रशासनाला नाहक त्रास देण्याचा उपद्रव केला होता, अशी माहितीपुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांचे प्रशासनाला पत्र कोरोनाबाधित असल्याने त्याच्यामुळे आधीच परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. उपचारानंतर सुट्टी झाल्यावर त्याने स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची आणि इतरांची पुरेशी काळजी न घेता सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गंभीर असून त्याची एकूणच वृत्ती बघता त्याला पुन्हा क्वॉरेटाईन करण्यात यावे, अशी सूचनावजा मागणी पोलिसांनी प्रशासनाकडे शनिवारी एका पत्रातून केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरPoliceपोलिस