मारहाणीची तक्रार केली म्हणून हमालास तिघांची बेदम मारहाण, ठाण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 20:37 IST2022-02-27T20:36:53+5:302022-02-27T20:37:06+5:30

मारहाणीची तक्रार देणाऱ्या हमालास पुन्हा लाकडी बांबूने विशाल पाटील याच्यासह तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी विशाल याच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

coolie beaten as he complained of assault incident in Thane | मारहाणीची तक्रार केली म्हणून हमालास तिघांची बेदम मारहाण, ठाण्यातील घटना

मारहाणीची तक्रार केली म्हणून हमालास तिघांची बेदम मारहाण, ठाण्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मारहाणीची तक्रार देणाऱ्या हमालास पुन्हा लाकडी बांबूने विशाल पाटील याच्यासह तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी विशाल याच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

वागळे इस्टेट, जिजामाता नगर येथे राहणारा अतुल ब्रिद (२८) हा हमाल २६ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास याच भागातील जिजामाता इमारतीच्या गेटजवळ उभा होता. त्यावेळी कैलास बकुळे याने पूर्व वैमनस्यातून लोखंडी पट्टीने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या विशाल पाटील आणि अन्य एका अनोळखीने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हीच तक्रार त्याने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी पत्र दिले. हेच पत्र घेऊन तो वागळे इस्टेट येथील एका खासगी रुग्णालयात गेला.

दवा उपचार करून झाल्यानंतर पैसे आणण्यासाठी घरी जात असतांनाच जिजामाता समोरील रस्त्यावर कैलास बकुळे, पाटील आणि अन्य एक अनोळखी अशा तिघांनी पुन्हा लाकडी बांबूने त्याला जबर मारहाण केली. याच मारहाणीची

Web Title: coolie beaten as he complained of assault incident in Thane