अल्पवयीन मुलींच्या सुरक्षा विषयक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वादंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:33 IST2021-07-30T16:32:03+5:302021-07-30T16:33:44+5:30
Goa CM Pramod Sawant : कोलवा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणामुळे गोवा हादरला होता आणि अशातच गोवा विधानसभा अधिवेशनात ह्या मुद्यावर विरोधक आक्रमक बनले आहेत.

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षा विषयक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वादंग
पणजी - ‘अल्पवयीन मुलींना बाहेर पाठविताना त्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांनीही घेतली पाहिजे ’ असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय माध्यमांनीही मुख्य बातमी केल्यामुळे हा आता राष्ट्रीय मुद्दा बनला असून त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कोलवा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणामुळे गोवा हादरला होता आणि अशातच गोवाविधानसभा अधिवेशनात ह्या मुद्यावर विरोधक आक्रमक बनले आहेत. गुरूवारी पत्रकारांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना तपास कामाविषयी विचारले असता त्यांनी हे वक्त्व्य केले. ते म्हणाले की या प्रकरणातील सर्व ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच यात सामील असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबीतही करण्यात आले आहे. नंतर ते म्हणाले की या प्रकरणात पालकही जबाबदार आहेत. अल्पवयीन मुलींना बाहेर पाठविताना पालकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे असे ते म्हणाले. गोव्यात गुन्हे वाढत असल्याचा दावा खोडून काढताना ते म्हणाले की गोव्यात गुन्ह्यांचा छडा लावला जात आहे की वस्तुस्थिती आहे. दरम्यान अल्पवयीन मुलींची जबाबदारी पालकांनी घ्यावी हे त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. सोशल मिडियावरही त्याचे पडसाद उठत आहेत. हे पडसाद टीकात्मकही आहेत आणि समर्थनार्थही आहेत.
पोलीस गस्त वाढविली
गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी या विषयी बोलताना सांगिले की या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयितांची कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच असे प्रकार टाळण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहेत असेही त्यांनी सांगितले