Poonam Pandey Arrest: वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेला मुंबईत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 23:22 IST2020-05-10T23:14:22+5:302020-05-10T23:22:03+5:30
पुनम पांडे तिच्या अलिशान कारने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरत होती. यावेळी लॉकडाऊन असल्याने पोलिसांनी तिला अडविले.

Poonam Pandey Arrest: वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेला मुंबईत अटक
मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी आणि बोल्ड फोटो, व्हिडीओंमुळे चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडेला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. तिच्यासोबत अन्य एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पुनम पांडे तिच्या अलिशान कारने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरत होती. यावेळी लॉकडाऊन असल्याने पोलिसांनी तिला अडविले. लॉकडाऊनमध्ये फिरत असल्याने तिला आणि तिच्यासोबत असलेल्या सॅम अहमद बॉम्बे (वय ४६) याला अटक करण्यात आली.
पूनम पांडेला पोलिसांनी अटक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सहा वर्षांपूर्वीही तिला भावासोबत वाहन चालवत असताना चुकीच्या पद्धतीने वागल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली होती. यावर तिने पोलिसांवर माझे नाव समजल्यानंतर कारवाई केल्याचा आरोप केला होता.
महत्वाच्या बातम्या...
लडाखचे हवामान दाखवायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर आपटला
पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
CoronaVirus मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार