शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
2
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
3
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
4
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
5
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
6
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
7
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
8
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
9
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
10
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
11
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
12
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
13
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
14
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
15
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
16
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
17
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
18
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
19
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
20
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवरी, हॉटेल, बाथरूम...; वडिलांच्या दुसऱ्या लग्नात आईसह पोहोचली २ मुलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:01 IST

अलवरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल जयकिशन घटस्फोट न घेता दुसरं लग्न करत होता.

राजस्थानमधील अलवरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल जयकिशन घटस्फोट न घेता दुसरं लग्न करत होता. त्याचं पहिलं लग्न २०११ मध्ये रीनाशी झालं होतं. त्याला १३ आणि १४ वर्षांची दोन मुलं आहेत. लग्नाच्या काही वर्षांनंतर जयकिशनचे इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप रीनाने केला आहे. रीनाच्या म्हणण्यानुसार, तो तिला सतत शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण करायचा.

रीना दोन्ही मुलांना घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी परतली. याच दरम्यान एके दिवशी रीनाला समजलं की, जयकिशन रेनी येथील एका महिलेशी लग्न करत आहे. लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या. अशातच रीना आपल्या दोन्ही मुलांना घेऊन लग्नाच्या ठिकाणी आली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. लग्न मंडपात एकच गोंधळ झाला.

रीनाला पाहून जयकिशन घाबरला. त्याने होणाऱ्या नवरीचा हात धरला आणि थेट हॉटेलच्या बाथरूममध्ये गेला. दरवाजा आतून बंद केला. संपूर्ण कुटुंब आणि कर्मचारी दरवाजा ठोठावू लागले. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. २०-२५ मिनिटे दार वाजवल्यानंतर दोघेही बाहेर आले. लग्न मंडपात तणावपूर्ण वातावरण झालं होतं. यानंतर नवरीच्या कुटुंबीयांना सत्य समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आतापर्यंत या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही किंवा कोणतीही कारवाई झालेली नाही. जयकिशनचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप रीनाचा आहे. तो तिला मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तो मुलांना वाढवण्यातही मदत करत नव्हता. रीनाने सांगितले की तिने जयकिशनला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सुधारला नाही आणि आज तो दुसरं लग्न करत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife, Kids Disrupt Cop's Second Wedding; Groom Flees to Bathroom

Web Summary : Rajasthan cop tried marrying again without divorce. First wife, with their two children, interrupted the wedding ceremony. The groom and his bride locked themselves in a bathroom. The bride's family learned the truth, causing chaos. No FIR has been filed yet.
टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी