Congress Hanumant Pawar Pune Crime: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यातील स्वारगेट मित्र मंडळ चौकात असणाऱ्या वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर मारहाण झाल्याची घटना घडली. भाजपाचे तुषार दामगुडे यांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तुषार दामगुडे यांना त्वरित अटक करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तीन दिवसांपूर्वी वृत्तवाहिनीवर एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मारहाण करणारे दोन जण ताब्यात
एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. डिबेट शोसाठी ते संबंधित ठिकाणी गेले असताना तुषार दामगुडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. डीसीपी मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यात बाचाबाची झाली. तिथे असलेल्या चार ते पाच लोकांनी हनुमंत पवार यांना मारहाण केली. या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. मारहाण करणारे तुषार दामगुडेचे सगळे मित्र आहेत. दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे मोहिते यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
"मी एका वृत्तवाहिनीच्या डिबेट शो साठी गेलो होतो. तिथे मी भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता, त्याची आठवण करून दिली आणि याचाच राग या कार्यकर्त्यांना आला. बाहेर आल्यानंतर मला धमकवण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल बोललो, तर तुला राग का येतो, असे म्हणत कमरेला बघ पिस्तुल आहे, असे त्यांनी धमकवले. पण मी अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि अशा पिस्तुलला देखील घाबरत नाही असं बोलल्यानंतर त्यांनी थेट माझ्यावर हल्ला केला. माझ्या छातीवर आणि तोंडावर जोरदार मार बसला. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे ही कुठली पद्धत आहे?" असे मत हनुमंत पवार यांनी व्यक्त केले.
Web Summary : Congress spokesperson Hanumant Pawar was assaulted in Pune by alleged BJP workers following a heated debate. Two individuals are in custody. Pawar claims he was threatened and then attacked after a debate regarding Shivaji Maharaj. An investigation is underway.
Web Summary : पुणे में कांग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार पर कथित भाजपा कार्यकर्ताओं ने हमला किया। बहस के बाद हमला हुआ। दो लोग हिरासत में हैं। पवार का दावा है कि शिवाजी महाराज पर बहस के बाद उन्हें धमकी दी गई और फिर हमला किया गया। जांच चल रही है।