शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुंतागुंतीच्या गुन्ह्याची २४ तासांत उकल, संशयिताकडून डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 20:48 IST

म्हापसा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

ठळक मुद्देकिरकोळ कारणावरून झालेल्या वादात संशयिताने मृत युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता. याप्रकरणी मुकेश देवेकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता  संशयिताने खून केल्याचे सांगितले.

म्हापसा : एका रहस्यमय गुन्ह्याची उकल करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले. हळदोणा मतदारसंघातील किटला या गावात गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला झालेल्या एका सत्तावीस वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी २४ तासांत संशयित आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात संशयिताने मृत युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता.म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयित आरोप मुकेश विनायक देवेकर (रा. लाजोर, किटला-हळदोणा) असे नाव आहे. तर अविनाश यशवंत साखळकर (२७, रा. किटला-हळदोणा) असे मयताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रात्री ७.२० ते ९.४५ दरम्यान घडली.शुक्रवारी रात्री उशिरा तक्रारदार मयताच्या आईने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता तिथे त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झालेला एक मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपथकांची नियुक्ती केली. तसेच पोलिसांकडून तपासाच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांची चौकशी केली व मिळालेल्या माहितीच्या आधारे २४ तासांच्या आत या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यास आम्हाला यश मिळाल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.याप्रकरणी मुकेश देवेकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता  संशयिताने खून केल्याचे सांगितले. संशयित आरोपी हा मासेमारीसाठी गेला होता. त्याठिकाणी मयताने अगोदर संशयितासोबत किरकोळ कारणावरून भांडण उकरून काढले असता त्याचे पर्यावसन मारामारीत झाले व रागाच्या भरात संशयिताने मयताच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून केला. घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचरण केले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.दरम्यान, या तपास कामात पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई व पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पोलीस निरीक्षक  संदेश चोडणकर, पोलीस निरीक्षक  विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षक  आशिष परोब, अनिल पोळेकर, सुनील पाटील तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, आल्विटो डिमेलो, इर्षाद वाटंगी, रिकी फर्नांडिस, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, फ्रँकी वाझ, सर्वेश मांद्रेकर, लक्ष्मीकांत नाईक, अभिषेक कासार, विजय नाईक, प्रकाश पोळेकर, सुरज शेट्ये, रामा लाड, गगन गावकर यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हे तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिसgoaगोवा