शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 14:16 IST

शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांकडे एका नागरिकांने तक्रार केली आहे.

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या भितीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि खासगी कार्यक्रम, सभा-संमेलनाला शासनाने बंदी घातली असताना सुमारे २०० लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांकडे एका नागरिकांने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मनीष प्रदीप मेश्राम (रा.सिरसपेठ, नागपूर) असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्यांनी एका व्हिडीओचा संदर्भ या तक्रारीत दिला आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे हे येथील हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात ३१ मे २०२० ला आयोजित कार्यक्रमात २०० लोकांच्या उपस्थितीत मंचावरुन संबोधन करताना दिसून येत असल्याचे म्हटले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात, भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वरुपाच्या राजकीय, सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी प्रदान केली नसताना, मुंढे यांनी या समारंभात उपस्थित राहून सरकारच्या दिशानिर्देशांचा भंग केल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंढे यांनी असा कार्यक्रम आयोजित करुन २०० लोकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोपही या तक्रारीत आहे. नागरिकांची गर्दी होऊन महामारीचा प्रादुर्भाव वाढेल,अशी शासन विरोधी कृती करून एका सनदी अधिकाऱ्याने शासनाच्या मार्गदर्शक तत्वाला हरताळ फासला आहे.

अशी शासनविरोधी कृती करुन, अनेकांचा जीव धोक्यात घालत, मुंढे यांनी चुकीचा संदेश पसरवला आहे. ज्या अधिका-यावर नागपूर शहरातील महामारी रोखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तेच सनदी अधिकारी नियमांचे उल्लंघन करित असेल तर तो गंभीर गुन्हा ठरतो, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मेश्राम यांनी तक्रारीतून केली आहे.तक्रार मिळाली, चौकशी सुरू

यासंबंधाने गणेशपेठ पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी मेश्राम यांची तक्रार मिळाली. सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून या तक्रारीची चौकशी केली जात असल्याची माहिती दिली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूरPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस