ट्युशनवरून येत होती, नराधमांकडून गँगरेप; आसाममध्ये लोक उतरले रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 06:30 IST2024-08-24T06:26:47+5:302024-08-24T06:30:02+5:30
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास धिंग परिसरात ट्युशन संपल्यानंतर सायकलवरून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी हल्ला करून तिच्यावर बलात्कार केला.

ट्युशनवरून येत होती, नराधमांकडून गँगरेप; आसाममध्ये लोक उतरले रस्त्यावर
गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यात १४ वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी केलेल्या बलात्काराच्या विरोधात आसाममध्ये राज्यभरात प्रचंड निदर्शने करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास धिंग परिसरात ट्युशन संपल्यानंतर सायकलवरून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी हल्ला करून तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितले की, तीनजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीवर हल्ला केला. यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार करत तिला जखमी तसेच बेशुद्धावस्थेत एका तलावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिले. दहावीची विद्यार्थिनी असलेल्या या पीडितेला स्थानिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. मुलीला प्रथम धिंग येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले व नंतर उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी नागाव रुग्णालयात पाठविण्यात आले. गेल्या दोन महिन्यांत असे २३ घटना घडल्या आहेत.