शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

काँग्रेसच्या संकटमोचकावर 'संकट'; शिवकुमार यांना ईडीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 21:29 IST

आज त्यांना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देसक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले होते. ही समन्स रद्द करण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी  उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बेंगळुरु : कर्नाटककाँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावरच संकट ओढावले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले होते. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. डी. के. शिवकुमार यांना 2018 मध्ये ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी ईडीने काढलेली नोटीस रद्द करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयायात धाव घेत अर्ज दाखल होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, याविषयी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी मागील दोन वर्षात माझ्या आईच्या नावे असणारी संपत्ती वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी बेनामी असल्याचे सांगत जप्त केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आज ईडीने शिवकुमार यांना अटक केली आहे. ईडीच्या कचाट्यात सापड़लेले पी चिदंबरम यांच्यानंतर शिवकुमार दुसरे मोठे नेते आहेत. शिवकुमार यांनीच कर्नाटक सत्तांतरावेळी नाराज आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना मुंबईतून माघारी परतावे लागले होते.  2017 मध्ये डी. के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात 8 कोटी 59 लाखांची बेकायदा रक्कम आढळून आली होती. याप्रकरणातील चौकशीदरम्यान डी. के शिवकुमार यांनी खोटी माहिती दिली, असा आरोप करून ईडीने त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याचबरोबर, डी. के शिवकुमार यांनी हलावा एजंटमार्फत कोट्यवधी रुपये बदलून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावले होते. ही समन्स रद्द करण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी  उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मी भाजपमधील हितचिंतकांचे अभिनंदन करतो. त्यांचे मला अटक करण्याचे मनसुबे सफल झाले. आयकर विभाग आणि ईडीची प्रकरणे माझ्याविरोधात राजकीय हेतूने रचली गेली. मी भाजपाच्या सूडाच्या राजकारणाचा बळी ठरलो, असे ट्विट शिवकुमार यांनी अटकेच्या आधी केले आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArrestअटकPoliceपोलिसKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरcongressकाँग्रेस