नायजेरियन नागरिकांकडून कोकेन जप्त; काशिमीरा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 17:29 IST2019-02-04T17:27:32+5:302019-02-04T17:29:41+5:30

अ‍ॅचिपाँग इमेन्युअल (वय ३७) आणि ओदोई ख्रिस्तोपर टोनी (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Cocaine seized by Nigerian citizens | नायजेरियन नागरिकांकडून कोकेन जप्त; काशिमीरा पोलिसांची कारवाई

नायजेरियन नागरिकांकडून कोकेन जप्त; काशिमीरा पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देयाआधी देखील पोलिसांनी काही नायजेरियन नागरिकांना विविध गुन्ह्यांत अटक केली होती.रात्रभर चालणारा धिंगाणा, बेकायदा बार, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी विरोधात रहिवाशांनी अनेक आंदोलनं केली आहेत.

मीरा रोड - काशिमीरा पोलिसांनी मीरा रोड येथील हायटेक भागातून दोन नागरिकांना बेडया ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. याआधी देखील पोलिसांनी काही नायजेरियन नागरिकांना विविध गुन्ह्यांत अटक केली होती.

अ‍ॅचिपाँग इमेन्युअल (वय ३७) आणि ओदोई ख्रिस्तोपर टोनी (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मूळचे आफ्रिकेच्या घाना येथील रहिवासी असून सध्या हाटकेशच्या थ्रीडी क्रिएशनशेजारी राहत होते. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार किमतीचे १८ ग्रॅम कोकेन, दोन मोबाइल व इलेक्ट्रीक वजनकाटा जप्त केला आहे. हाटकेश परिसरात काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांनी घातलेल्या धुमाकुळामुळे स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. रात्रभर चालणारा धिंगाणा, बेकायदा बार, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी विरोधात रहिवाशांनी अनेक आंदोलनं केली आहेत.

 

Web Title: Cocaine seized by Nigerian citizens