बॉक्सिंगचे करिअर खराब करेन असं धमकावून प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:57 IST2021-03-11T13:55:52+5:302021-03-11T13:57:46+5:30
Rape in Mumbai : टिळक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ३७६, ३७६ (३), ५०६ आणि पॉक्सो ऍक्ट कलम ४, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉक्सिंगचे करिअर खराब करेन असं धमकावून प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असून टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणात बॉक्सिंग प्रशिक्षकाला (वय ३०) अटक केली आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. टिळक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ३७६, ३७६ (३), ५०६ आणि पॉक्सो ऍक्ट कलम ४, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही अस्वस्थ असल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीचे बॉक्सिंग प्रशिक्षक यांना त्यांच्या घरी बोलावून त्यांची अल्पवयीन मुलीस समजविण्यासाठी सांगितले. नंतर अटक आरोपीने मुलीस बाहेर फिरायला घेऊन जातो असे सांगून एका ऍथलेत लेट क्लबमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संभोग केला. याबाबत मुलीने घरी सांगितले तर तिचे बॉक्सिंगचे करिअर खराब करेन अशी धमकी आरोपीने दिली. पीडित मुलगी या प्रशिक्षकाच्या क्लासमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होती.
या मुलीच्या वडिलांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या प्रशिक्षकाचे बिंग फुटले. पोलिसांनी बुधवारी रात्री टिळक नगर येथून या प्रशिक्षकाला ताब्यात घेतले. पीडित मुलीवर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.