शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कपडे लवकर मागितले, शिंप्याने कैची खुपसली; किडनी निकामी होऊन तरुणाचा मृत्यू, मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 11:22 IST

संगम गल्ली येथे चांद आलम शेख यांचा महिलांच्या कपड्याचे शिवणकाम करण्याचा कारखाना आहे.

मुंबई: शिवलेले कपडे लवकर मागितले म्हणून झालेल्या वादात शिंप्याने २२ वर्षीय तरुणाच्या पोटात कैचीच खुपसली. धारावीत हा प्रकार घडला असून जखमी तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असताना किडनी निकामी होऊन शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संगम गल्ली येथे चांद आलम शेख यांचा महिलांच्या कपड्याचे शिवणकाम करण्याचा कारखाना आहे. अटक आरोपी बद्दिन खान (२२) हा या ठिकाणी काम करायचा. तर त्याने शिवलेल्या कपड्यांचे धागे तोडण्याचे काम मयत नकिब अब्दुल सत्तार (२२) हा करायचा. २ डिसेंबर रोजी सकाळी बद्रुद्दिन आणि नकीब यांच्यात कामावरून वाद झाले. 

बदुद्दिन हा कपडे शिवण्यात टंगळमंगळ करतोय, असा आरोप नाकिबने केला. त्यावरून त्यांच्यात मोठ्याने वाजले आणि रागाच्या भरात बद्रुद्दीनने कपडे कापण्याची पितळी कैची थेट त्याच्या पोटात खुपसली. पीडितचा भाऊ तैकिर आलम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याप्रकरणी आम्ही हल्लेखोरावर हत्येचे कलम वाढवले आहे. त्याला आधीच कलम ३०७ व ५०४ अंतर्गत अटक करण्यात आली होती.व- विजय कांदळगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस