शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर दोनच महिन्यांत अख्ख घर केलं 'साफ', फिल्मी स्टाईलने 'लुटेरी दुल्हन' झाली फरार; पती म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:16 IST

या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे एसएचओ कांचन भास्कर यांनी म्हटले आहे. 

बिहारमधील पश्चिम चंपारण्यमधील योगापट्टी येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, एक 'लुटेरी दुल्हन' अख्खे घर साफ करून फिल्मी स्टाईलने फरार झाल्याची अथवा पळून गेल्याची घटना घडली आहे. ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची शक्यता आहे. तिने घरातील दागिने, कपडे आणि इतर वस्तूही लंपास केल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही सापडली नाही. यानंतर, पतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. ही घटना २० मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित तरुणाचे लग्न दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे एसएचओ कांचन भास्कर यांनी म्हटले आहे. 

संबंधित पीडित पतीचे नाव राजाबाबू असून त्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जा म्हटले आहे की, "माझे लग्न दोन महिन्यांपूर्वी निशु देवीसोबत झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर, निशु मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलत होती. मी तिला बोलतानाही पकडले  होते. यानंतर तिला फटकारल्यानंतर, तिने बोलणे बंद केले होते. दरम्यान ती ज्या नंबरवर बोलत होती, तो नंबर मी लिहून ठेवला होता. २० मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच नंबरवरून फोन आला होता.

यानंतर ती (पत्नी) घरातून दागिने, कपडे आणि इतर मौल्यवान साहित्य घेऊन पळून गेली. ती तोच नंबर असलेल्या तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची शक्यता आहे. मी माझ्या पातळीवर तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. यानंतर, मी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करत आहे. संंबंधित  'लुटेरी दुल्हन'चे हे कृत्य परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस