आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, एकाला अटक तर इतरांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:33 IST2023-01-05T10:33:03+5:302023-01-05T10:33:23+5:30
विद्यार्थिनी कोचिंग क्लासमधून परतत असताना पाच जणांनी तिचे अपहरण केले व अत्याचार केला.

आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, एकाला अटक तर इतरांचा शोध सुरू
पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यात आठवीतील विद्यार्थिनीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये पीडितेचा एक परिचित व त्याच्या चार मित्रांचा समावेश आहे. यात एक ऑटोरिक्षा चालक आहे.
विद्यार्थिनी कोचिंग क्लासमधून परतत असताना पाच जणांनी तिचे अपहरण केले व अत्याचार केला. ती रात्री उशिरापर्यंत परतली नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ती न सापडल्यामुळे पोलिसांना माहिती दिली. याच दरम्यान एकाने फोन करून मुलीबाबत माहिती दिली.
आरोपींमधील गोलू कुमार (१८) याला ती आधीपासून ओळखत होती. त्याच्या बोलावण्यावरून ती गेली असता त्याने इतर मित्रांना बोलावले होते.
सर्वांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला एका मंदिराजवळ सोडून सर्वांनी पलायन केले. पोलिसांनी आरोपींपैकी रिक्षाचालकाला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.