शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शाळा बंद, ‘तिची’ खूपच येऊ लागली आठवण; ९ वीच्या मुलामुलीने प्रेमात जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

By प्रविण मरगळे | Published: January 13, 2021 10:24 AM

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत, ९ वी शिकणारे हे दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात, वर्षभरापासून भेट झाली नाही

ठळक मुद्देदोघांनी २८ डिसेंबरला घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवलादोघंही रानोली रेल्वे स्टेशनला गेले होते, त्याठिकाणी कोणतीही ट्रेन मिळाली नाहीवापी पोहचल्यानंतर तेथे या दोघांनी ५०० रुपये भाड्याने एक खोली घेतली

प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, पण ते खरंच असतं का? गुजरातमध्ये घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न तुम्हाला नक्की विचार करायला लावणारा आहे. अनेकदा प्रेमी जोडप्यांनी पळून जाऊन लग्न केल्याचं आपण ऐकलं असेल पण छानी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलामुलीने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. गुजरातमधील छानी येथे राहणाऱ्या या मुलांनी घरातून ३० हजार रुपये घेऊन पसार झाले आणि १३ दिवसांच्या शोधानंतर पुन्हा घरी परतले.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत, ९ वी शिकणारे हे दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात, वर्षभरापासून भेट झाली नाही, सतत आठवण येतेय म्हणून मुलांनी घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला असं पोलिसांच्या माहितीनुसार कळाले, या दोघांनाही कपलप्रमाणे एकत्र राहायचं होतं, एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्ताप्रमाणे दोघांनी २८ डिसेंबरला घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला, त्यासाठी मुलाने घरातील मंदिरात ठेवण्यात आलेले २५ हजार आणि मुलीने ५ हजार चोरी केले. जेव्हा कुटुंबाला या मुलं सापडली नाहीत तेव्हा त्यांनी छानी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंद केली.

घरातून पळाल्यानंतर दोघंही रानोली रेल्वे स्टेशनला गेले होते, त्याठिकाणी कोणतीही ट्रेन मिळाली नाही, मग तेथून दोघं सयाजीगुंज येथे गेले. त्यानंतर वापीला जाण्यासाठी खासगी टॅक्सी बूक केली, मुलाला वापी येथील बरीच माहिती होती, कारण तो कुटुंबासोबत त्याठिकाणी अनेकदा गेला होता. वापी पोहचल्यानंतर तेथे या दोघांनी ५०० रुपये भाड्याने एक खोली घेतली आणि लव्ह इन रिलेशनप्रमाणे राहू लागले.

जेव्हा घरातून आणलेले पैसे संपले तेव्हा मुलाने एका कपड्याच्या दुकानात नोकरी केली, ज्याठिकाणी त्याला दिवसाला ३६६ रूपये मिळत होते, काही दिवसांपूर्वी मुलाने आपल्याला मित्राला संपर्क केला तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली, पोलिसांनी वापीमध्ये या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना वडोदरा येथे आणले. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले तर मुलाला क्वारंटाईन करण्यात आलं.

टॅग्स :PoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट