उल्हासनगर पोलीस ठाण्यातच दोन गटात राडा 

By सदानंद नाईक | Updated: April 9, 2023 17:07 IST2023-04-09T17:06:01+5:302023-04-09T17:07:26+5:30

उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्ही गट शनिवारी रात्री १० वाजता आले.

clash in two groups at the Ulhasnagar police station itself | उल्हासनगर पोलीस ठाण्यातच दोन गटात राडा 

उल्हासनगर पोलीस ठाण्यातच दोन गटात राडा 

उल्हासनगर : अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यावरून शनिवारी  रात्री उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात तुफान राडा झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत हाणामारी करणाऱ्या ८ जणांवर पोलीस ठाण्यातील कामकाज व सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्ही गट शनिवारी रात्री १० वाजता आले. पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही गट आमने सामने आल्यावरून त्यांच्यात तू तू मैं मैं व शिवीगाळ होऊन प्रकार हाणामारी पर्यंत गेला. याप्रकाराने पोलीस ठाण्यात काय चालले. हे बघण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून पोलीस ठाण्यातील कामकाज व सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी परविंदर सिंग गुलवान, संगत सिंग गुलवान, हरजित सिंग गुनवान, आशा कौर संगीत सिंग , किरण सिंग परविंदर सिंग, सोहम सिंग लबाना, परमजित सिंग लबाना व अजित सिंग लबाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

 उल्हासनगर पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर रात्रभर दोन्ही गटात तू तू मैं मैं कायम होती. क्षुल्लक कारणावरून दोन्ही गट अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यावर, सदर प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पुलपगारे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: clash in two groups at the Ulhasnagar police station itself