पाव कमी दिल्याच्या वादावरून ग्राहक आणि दुकानदाराच्या हाणामारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:20 IST2018-10-15T21:20:16+5:302018-10-15T21:20:54+5:30

या घटनेत तीन ते चारजण जखमी झाले असून दुकानदार दिनेश मोर्या या दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार दुकानाबाहेर सुरु होता. या संदर्भातील गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Clash between customers and shopkeepers | पाव कमी दिल्याच्या वादावरून ग्राहक आणि दुकानदाराच्या हाणामारी 

पाव कमी दिल्याच्या वादावरून ग्राहक आणि दुकानदाराच्या हाणामारी 

ठाणे - भिवंडी शहरात कामघत येथील हनुमान नगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. परिसरातील मोरया किरणा दुकानामध्ये झालेल्या किरकोळ वादातून दुकानाची तोडफोड करून दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. शहरतील कामघत परिसरात असलेल्या मोरया दुकानामध्ये सकाळच्या सुमारास एक ग्राहक पाव मागण्यासाठी गेला असता १० रुपयांना ५ पाव दुकानदाराने दिले. मात्र, १० रुपयांना ६ पाव येतात व ते न दिल्याने ग्राहक आणि दुकानदारामध्ये बाचाबाची झाली. नंतर ग्राहकाने स्वतः च्या भावासह इतर कुटुंबाला सोबत आणून दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली.  तसेच वाद वाढल्याने दुकानदारासह त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली.

या घटनेत तीन ते चारजण जखमी झाले असून दुकानदार दिनेश मोर्या या दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार दुकानाबाहेर सुरु होता. या संदर्भातील गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Clash between customers and shopkeepers