शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

धक्कादायक! Instagram रिलने केला घात, चार तरुण तलावात बुडाले, तीन तासानंतर मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 11:42 IST

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामसाठी रिल बनवत असताना चार तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  राजस्थान येथील रामसरा गावात चार तरुण पोहोण्याचा रिल बनवत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. प्रशासनाच्या मदतीने गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आणि सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी तरुणाचे मृतदेह बाहेर काढले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामसरा गावातील चार तरुण रुल बनवण्यासाठी तलावाच्या कठड्यावर चढले. यादरम्यान २१ वर्षीय सुरेश या तरुणाचा चालत असताना तोल गेल्याने तो बुडू लागला. सुरेशला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघे साथीदार खोल पाण्यात गेले, या दरम्यान त्यांचा बुडून मृत्यू झाला. रामसरा येथील सुरेश नायक (२१), योगेश रेगर (१८), लोकेश निमेल (१८) आणि कबीर सिंग (१८) यांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत रामसरा येथील रहिवासी जीतू प्रजापत, उमर प्रजापत, रणजित कडवसरा, ताराचंद प्रजापत, सुभाष, ओमप्रकाश नई आणि प्यारेलाल यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्यानंतर चार मृतदेह बाहेर काढले.

ऐश्वर्या रजनीकांतच्या घरी चोरी, पोलीस तक्रार; डायमंडसेटसह दागिने गायब

यावेळी तलावाच्या बाहेर असणाऱ्या तरुणाने गावातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी व तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. 

या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते हरलाल सहारन, तहसीलदार धीरज झझाडिया, सीओ सिटी राजेंद्र बुरडक, पोलीस स्टेशन अधिकारी रतननगर जसवीर यांच्यासह सदर व रतननगरचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत भाजप नेते हरलाल सहारन म्हणाले की, अशा अपघातांमध्ये बचावासाठी प्रशासनाकडे कोणतेही साधन नाही. १०८ रुग्णवाहिकाही तासाभराने उशिरा पोहोचली, त्यावरून मृतदेह पिकअपने रुग्णालयात नेण्यात आला. यासोबतच चार मृतदेहही ग्रामस्थांनी बाहेर काढले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम