२८ वर्षांपासून फरार सराईत चोरास पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:45 IST2019-06-14T19:44:32+5:302019-06-14T19:45:50+5:30
या आरोपीचं नाव मोहम्मद अल्ताफ हुसेन अफजल शेख (५३) असं आहे.

२८ वर्षांपासून फरार सराईत चोरास पोलिसांनी केली अटक
मुंबई - २८ वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे. या आरोपीचं नाव मोहम्मद अल्ताफ हुसेन अफजल शेख (५३) असं आहे.
मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात आणि गुन्हे शाखेत नोंद असलेल्या अनेक गुन्ह्यांतून जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या अनेक आरोपींचा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या कक्षांकडून विशेष मोहिमेअंतर्गत शोधकार्य सुरु आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलीस पथकाने अशा यादीतील फरारी आरोपींचे शोधार्थ जोगेश्वरी पूर्व परिसरात गुप्तपणे चौकशी करत होते. दरम्यान जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख हा गेल्या २८ वर्षांपासून फरार होता. त्याच्या एक महिन्यापासून पोलीस शोध घेत असताना आरोपी शेख ठाण्यातील घोडबंदर येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज सकाळी प्राप्त माहितीच्या आधारे सुसंगत अशा वर्णनाच्या इसमाची जुजबी चौकशी करत असताना त्यास चौकशी करणारे पोलीस असल्याचे कळताच तो पलायन करण्याचे प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी जागीच त्याला जेरबंद केले.
मुंबई - २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष क्रमांक १० ने केली अटकhttps://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2019