शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

निर्घृण हत्या, जंगलात सापडला मान कापलेला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:44 IST

Murder Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. सध्या पोलीस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.

मेरठमधील शिवलखासजवळील जंगलातून एका मुलाचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला आहे. त्याचे वय सुमारे 14-15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक शेतकरी शेतात पाणी घालण्यासाठी आला असता मृतदेहाची माहिती मिळाली.त्याला प्रथम मुलाचा मृतदेह दिसला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. सध्या पोलीस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. एसपी देहत केशव कुमार यांनी सांगितले की, एका मुलाचा मृतदेह सापडला आहे, ज्याचे वय 14-15 वर्षे आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यानंतरच काही सांगता येईल. सध्या गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा खून झाला होतादोन दिवसांपूर्वी मेरठमध्येही निर्घृण हत्या झाली होती. पतीने पत्नीवर हातोड्याने प्रहार करून खून केला होता. या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले आणि नंतर तिचा गळा चिरून तिची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवलोक पुरी येथील रहिवासी असलेल्या देवेंद्र सिंहचा विवाह प्रतिमासोबत झाला होता. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. प्रतिमा सरधना येथील नानू गावातील प्राथमिक शाळेत सरकारी शिक्षिका होती.पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. पतीही दारू प्यायचा आणि अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण व्हायचे, हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.प्रत्यक्षदर्शी 10 वर्षांचा मुलगा आशुने सांगितले की, तो सकाळी मोबाईलवर गेम पाहत होता, यासाठी आईने त्याला शिवीगाळ केली आणि शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्याने मारहाण केली. इतक्यात त्याचे वडीलही तिथे पोहोचले. वडिलांचे डोके दुखत होते. मुलाच्या मारहाणीवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीची हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश