चाईल्ड पोर्नोग्राफी फेसबुकवर वायरल केल्याने गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:41 PM2020-02-12T18:41:00+5:302020-02-12T18:45:15+5:30

फेसबुकवरून अल्पवयीन मुलांचे लैंगिक साहित्य प्रसारित केलेल्या नऊ अश्लील व्हिडीओ नालासोपारा तुळिंज पोलिसांनी जप्त केले आहेत.

Child pornography viral on facebook, offence filed | चाईल्ड पोर्नोग्राफी फेसबुकवर वायरल केल्याने गुन्हा दाखल

चाईल्ड पोर्नोग्राफी फेसबुकवर वायरल केल्याने गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देअज्ञात आरोपी विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पालघर जिल्ह्य़ातील वसई-विरारमधील १७ आयपी अ‍ॅड्रेसवरून लहान मुलांचे लैंगिक शोषण (चाईल्ड पोर्नोग्राफी) करण्यात येत होते. हे सर्व  ‘आयपी अ‍ॅड्रेस’ची वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये नोंद करण्यात आली आहे.

नालासोपारा - २३ मार्च २०१९ ते ८ मे २०१९ दरम्यान १६ आरोपींनी चाईल्ड पोर्नोग्राफी (मॅन्युफ्रेक्चर अँड डिस्ट्रिब्युटर) असलेले साहित्य फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल केले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुपेंद्र टेलर (38) यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार देऊन अज्ञात आरोपी विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

हे काय? अमरावतीतही चाईल्ड पोर्नोग्राफी


फेसबुकवरून अल्पवयीन मुलांचे लैंगिक साहित्य प्रसारित केलेल्या नऊ अश्लील व्हिडीओ नालासोपारा तुळिंज पोलिसांनी जप्त केले आहेत. ज्यांच्या नावे ‘आयपी’ (इंटरनेट प्रोटोकॉल) अ‍ॅड्रेस आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. व्यावसायिक वापरासाठी लहान मुलांचा वापर करून हे अश्लील व्हिडीओ तयार केले गेल्याचे प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पालघर जिल्ह्य़ातील वसई-विरारमधील १७ आयपी अ‍ॅड्रेसवरून लहान मुलांचे लैंगिक शोषण (चाईल्ड पोर्नोग्राफी) करण्यात येत होते. हे सर्व  ‘आयपी अ‍ॅड्रेस’ची वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये नोंद करण्यात आली आहे.



पालघर स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा नोंदवून पुढील तपास तुळिंज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. २३ एप्रिल २०१९ ते ८ मे २०१९ या कालावधीत बालकांचे अश्लील साहित्य संबंधित आयपी अ‍ॅड्रेसवरून वायरल करण्यात आल्याची माहिती फेसबुकने दिली होती. यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Child pornography viral on facebook, offence filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.