धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या मुलीचं अपहरण; दिवसभर बलात्कारानंतर शीर केलं धडावेगळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:37 IST2019-08-01T17:29:45+5:302019-08-01T17:37:26+5:30

धक्कादायक घटनेमुळे देशात खळबळ

Child Kidnapped From Jamshedpur railway Station Then Raped And Beheaded | धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या मुलीचं अपहरण; दिवसभर बलात्कारानंतर शीर केलं धडावेगळं

धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या मुलीचं अपहरण; दिवसभर बलात्कारानंतर शीर केलं धडावेगळं

जमशेदपूर: उन्नवमधील बलात्काराची घटना ताजी असताना आता झारखंडमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांची पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र मुलीचं शीर धडावेगळं का केलं, याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही.
 
रिंकू साहू आणि कैलाश या दोन तिशीतल्या तरुणांनी रेल्वे स्थानकातून एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण केलं. आईच्या शेजारी झोपलेल्या मुलीचं अपहरण होत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यानंतर पोलिसांनी रिंकू आणि कैलासला अटक केली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. रिंकू आणि कैलास यांनी बलात्कारानंतर संबंधित मुलीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि तो जमिनीत पुरला. आरोपींनी स्वत:हून ही जागा रेल्वे पोलिसांना दाखवली. पोलिसांनी मृतदेहाचे इतर भाग श्वान पथकाच्या मदतीनं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुसळधार पावसामुळे त्यात त्यांना यश आलं नाही. 

रिंकू साहूविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. २०१५ मध्ये रिंकूनं एका लहान मुलीचं अपहरण करुन तिच्या खूनाचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात त्याला तुरुंगवास घडला. मात्र तो जामिनावर सुटला. रिंकू आणि त्याचा मित्र कैलासनं दिवसभर पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी ती रडू लागल्यानं त्यांना तिचा गळा आवळला. त्यानंतर त्यांनी तिचं शीर धडावेगळं केलं. तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह पोलिसांना रेल्वे स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या झुडूपांमध्ये आढळून आला. 
 

Web Title: Child Kidnapped From Jamshedpur railway Station Then Raped And Beheaded