शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 21:55 IST

Underworld don Chhota Rajan : छोटा राजनच्या पोटात तीव्र वेदना आणि इतर काही समस्या आढळल्यामुळे छोटा राजनला एम्समध्ये दाखल करावे लागले. 

नवी दिल्ली - तिहार कारागृहात बंद असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती अचानक खालावली. त्याला एम्स रुग्णालयात दाखल करावे लागले. छोटा राजनच्या पोटात तीव्र वेदना आणि इतर काही समस्या आढळल्यामुळे छोटा राजनला एम्समध्ये दाखल करावे लागले. तिहार कारागृह क्रमांक २ मध्ये बंद असलेल्या छोटा राजनच्या प्रकृती अस्वस्थाबाबत मंगळवारी दुपारी माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. जेव्हा अचानक त्याच्या पोटात तीव्र वेदनेबाबत सुरक्षारक्षकांना माहिती मिळताच जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याविषयी कळविण्यात आले. छोटा राजनशी बोलल्यानंतर डॉक्टरांना बोलविण्यात आले. सुरुवातीला तुरूंगातील डॉक्टरांनीच छोटा राजनची तपासणी केली. परंतु या तपासणीत काही निष्कर्ष न लागल्याने एम्स रुग्णालयात पाठवणे डॉक्टरांनी निवडले. यानंतर सुरक्षेच्या दरम्यान छोटा राजन याला मंगळवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले.

छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. सोमवारी तिहारचे सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. सध्या त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचे दुष्परिणामहा पोस्ट-कोरोना प्रभाव असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सध्या केवळ डॉक्टरच याबद्दल सांगू शकतात. छोटा राजनला एका पूर्णपणे वेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे. जिथे इतर कैदी किंवा तुरूंगातील प्रत्येक कर्मचारी जाऊ शकत नाही. सुरक्षेची कारणे लक्षात घेऊन छोटा राजन नेहमी सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली असतो. जेणेकरून कोणीही त्याला कोणत्याही प्रकारे इजा करु शकत नाही.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनunderworldगुन्हेगारी जगतPoliceपोलिसjailतुरुंगAIIMS hospitalएम्स रुग्णालय