Chhota Rajan and baba bodke name used for threatening to collect ransom | छोटा राजन अन् बाबा बोडकेच्या नावाने धमकावत ' तो ' खंडणी वसूल करायचा..

छोटा राजन अन् बाबा बोडकेच्या नावाने धमकावत ' तो ' खंडणी वसूल करायचा..

वडगाव मावळ : छोटा राजन  व बाबा बोडके यांचे नावाने धमकावुन खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.
विकी पोपट गायकवाड (रा.जांभुळ ता.मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकिल गुलाबअल्ली सोमजी (रा.बोटक्लब रोड, पुणे) हे चालवत असलेल्या वृध्दाआश्रमात सेक्युरिटीचे काम द्यावे व ते दिले नाहीतर त्यापोटी दरमहा २५ हजार रूपये खंडणी द्यावी अशी मागणी केली होती.यानंतर सोमजी यांनी याकडे दुर्लक्ष केले. गायकवाड याने ९ जुनला मोबाईलवरून दहा व्हाट्स अँप मेसेज पाठून छोटा राजन त्यांचा मुलगा संकल्प तसेच बाबा बोडके यांच्या नावाने धमकावून अपहरण करण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमजी यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,रामेश्वर धोंडगे , विजय पाटील, दतात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, गणेश महाडिक यांनी सापळा रचून पकडले आणि कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Chhota Rajan and baba bodke name used for threatening to collect ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.