५ महिन्यांच्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला सोडून दुसऱ्या मुलीशी करत होता लग्न, पोलिसांची एन्ट्री अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:43 IST2025-05-28T10:34:09+5:302025-05-28T10:43:20+5:30

तरुणाची गर्लफ्रेंड ५ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. तरुणाला हे माहित होतं. तरीही, तो त्याच्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता.

chhatishgarh groom was getting married to another girl leaving his 5 month pregnant girlfriend arrested from the wedding venue | ५ महिन्यांच्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला सोडून दुसऱ्या मुलीशी करत होता लग्न, पोलिसांची एन्ट्री अन्...

५ महिन्यांच्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला सोडून दुसऱ्या मुलीशी करत होता लग्न, पोलिसांची एन्ट्री अन्...

छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील कुसमी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नादरम्यान असं काही घडलं की पोलिसांनी थेट नवरदेवालाच बेड्या घातल्या. लग्न मंडपातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने लग्नाचं आश्वासन देऊन त्याच्या गर्लफ्रेंडशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली. 

तरुणाची गर्लफ्रेंड ५ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. तरुणाला हे माहित होतं. तरीही, तो त्याच्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. गर्लफ्रेंडला हा धक्कादायक प्रकार समजतात तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यानंतर बलरामपूर जिल्ह्यातील कोरांधा पोलिसांनी आरोपीला मंडपातून अटक केली.

आरोपीचे तरुणीसोबत गेल्या ७-८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी तरुणाने मुलीला लग्नाचं खोटं आश्वासन दिलं आणि तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. तरुणी प्रेग्नेंट असल्याचं माहीत असूनही  तरुण दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी करत होता. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

Web Title: chhatishgarh groom was getting married to another girl leaving his 5 month pregnant girlfriend arrested from the wedding venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.