१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:40 IST2025-07-10T12:40:20+5:302025-07-10T12:40:46+5:30

मधेपुरा गावात छांगुर बाबाने जवळपास ३ कोटी खर्च करून भव्य कोठी बनवली आहे. प्रशासनाने ८ बुलडोझर लावून ही कोठी उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे

Chhangur Baba conversion racket News: Turnover of 100 crores, luxurious cell and secret room; Enhancement pills found with Chhangur Baba | १०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या

१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या

बलरामपूर - उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्या छांगुर बाबाच्या आलिशान कोठीवर मागील ३ दिवसांपासून बुलडोझर कारवाई सुरू आहे. याचवेळी अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. या कोठीतून शक्तिवर्धक औषधे, परदेशी मसाज तेलसह बरेच साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासात छांगुर बाबाच्या बँक खात्यावर १०० कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचेही पुढे आले आहे. ईडी या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत तपास करत आहे. 

मधेपुरा गावात छांगुर बाबाने जवळपास ३ कोटी खर्च करून भव्य कोठी बनवली आहे. प्रशासनाने ८ बुलडोझर लावून ही कोठी उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. कोठीत सापडलेल्या सीक्रेट खोलीतून शक्तिवर्धक गोळ्या, परदेशी तेल, शॅम्पू, साबण, फ्लोअर क्लीनर जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय अस्वी बुटीक नावाने एक बिल बुकही जप्त केले आहे ज्यातून छांगुर बाबाचे काळे कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. कोठीच्या उंच भिंतीच्या लोखंडी तारांमध्ये वीजेचा करंट आढळला आहे. धार्मिक पुस्तकांसह सीक्रेट रूम सापडली. ज्यामुळे बेकायदेशीर धर्मांतरणचा संशय आणखी बळावला आहे. ही कोठी गावात अवैधपणे बनवण्यात आली असून त्यात ७० हून अधिक खोल्या आहेत. ज्यातील ४० खोली बेकायदेशीर आहेत. या कोठीला मे आणि जून या काळात ३ नोटीस बजावल्या होत्या. परंतु कुठलेही उत्तर आले नाही म्हणून प्रशासनाकडून तोडक कारवाई सुरू केली. 

हिंदू युवतींना फसवून धर्मांतरण करण्याचा दबाव

शनिवारी उत्तर प्रदेश एटीएसने लखनौच्या एका हॉटेलमधून छांगुर बाबा आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीनला अटक केली. त्यांच्या तपासात हे बेकायदेशीर धर्मांतरणाचे रॅकेट चालवत असल्याचे पुढे आले. ज्यात परदेशी फंडिंगमधून १०० कोटीहून अधिक व्यवहार झाला आहे. हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले जायचे. या टोळीतील सदस्यांनी ४० हून अधिक इस्लामिक देशांचा दौरा केला आहे. 

दरम्यान, बुधवारी सकाळी प्रशासनाची टीम इथं पोहचली आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. १५०० स्क्वेअर फूट अवैध बांधकाम उद्ध्वस्त केले. अजूनही ही कारवाई सुरू आहे. छांगुर बाबाने ६ जर्मन शेफर्ड कुत्रे पाळले होते. मेन गेटपासून कोठीपर्यंत येण्यासाठी खासगी रस्ता बनवण्यात आला आहे. छांगुर बाबाने २०२२ मध्ये सरकारी जमिनीवर कब्जा करून ही कोठी बनवली होती. 

कोण आहे छांगुर बाबा?

कधीकाळी सायकलवर बसून अंगठ्या विकणारा छांगुर बाबा पाहता पाहता कोट्यवधीच्या साम्राज्याचा मालक बनला. छांगुर बाबा धर्मांतरणाचे मोठे रॅकेट चालवतो. एकदा तो मुंबईला गेला आणि तिथून परतल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. छांगुर बाबाने इतक्या कमी वेळात ही संपत्ती कमावली. सध्या एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

Web Title: Chhangur Baba conversion racket News: Turnover of 100 crores, luxurious cell and secret room; Enhancement pills found with Chhangur Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.