शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:25 IST

एटीएस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या नव्या एफआयआरमध्येही या चौघांची नावे आहेत. आझमगड, मऊ, गोंडा आणि जौनपूर येथील इतर अनेक आरोपींचाही या प्रकरणात सहभाग आहे.

सध्या उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा (छांगूर बाबा प्रकरण) प्रकरण जबरदस्त चर्चेत आहे. छांगूर बाबांसंदर्भात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. छांगूर बाबाने लव्ह जिहादसाठी 'शिजर-ए-तैयबा' नावाने एक पुस्तकही प्रकाशित केले होते. आता एटीएस या पुस्तकात लिहिलेल्या शब्दांची चौकशी करत आहे. छांगूर बाबा या पुस्तकाद्वारे लोकांना लव्ह जिहादसाठी भडकावत असे. मुस्लीम आणि हिंदू तरुणांना जाळ्यात ओढत होता. आज एटीएस छांगूर बाबांबद्दल खुलासा करू शकते. महत्वाचे म्हणजे, एटीएसचे पथक रात्री उशिरा छांगूर बाबांसह बलरामपूरला पोहोचल्याचे वृत्त आहे.

याच वेळी, ईडीने छांगूर बाबांच्या जवळच्या लोकांचीही चौकशी सुरू केली आहे. बेकायदेशीर धर्मांतर आणि निधी प्रकरणात ईडीच्या तपासाला वेग आला आहे. छांगूर बाबांचा जवळचा सहकारी नवीन रोहरा याच्या सात बँक खात्यांबद्दल ईडीला माहिती मिळाली आहे. तथापि, दीड डझन इतर खात्यांबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. ईडीने बलरामपूर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये छांगूर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नावाने खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती सब-रजिस्ट्रार कार्यालयांकडून मागवली आहे.

पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ -एटीएसच्या तपासात एक मोठा खुलासा झाला आहे, बलरामपूरमधून अटक करण्यात आलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूरचे चार जवळचे सहकारी पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर धर्मांतराचा खेळ खेळत होते. या चौघांविरुद्ध २५ मे २०२३ रोजी आझमगडच्या देवगाव पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये एकूण १८ जणांची नावे आहेत, ज्यात छांगूरचे जवळचे सहकारी बलरामपूरचे रहिवासी मोहम्मद सबरोज, रशीद, शहाबुद्दीन आणि गोंडा येथील रहिवासी रमजान यांचा समावेश आहे.

एटीएस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या नव्या एफआयआरमध्येही या चौघांची नावे आहेत. आझमगड, मऊ, गोंडा आणि जौनपूर येथील इतर अनेक आरोपींचाही या प्रकरणात सहभाग आहे. यात, जामगड रहिवासी अवधेश सरोज उर्फ वकील, उषा देवी, पन्नालाल गुप्ता, सिकंदर, हसीना, कुंदन बेनवंशी, आकाश सरोज, मऊ रहिवासी मोहम्मद जावेद, परवेज आलम, इरफान अहमद, साबीर अली, जावेद अहमद आणि जौनपूर रहिवासी फयाज यांच्या नावांचाही समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीमIslamइस्लामPoliceपोलिस