शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

Home Theatre Blast: 'होम थिएटर ब्लास्ट' प्रकरणात मोठा खुलासा; वधुच्या प्रियकरानेच त्यात ठेवला होता बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 22:07 IST

Chattisgarh Home Theatre Blast: लग्नात गिफ्ट मिळालेल्या होम थिएटरचा भीषण स्फोट होऊन नवऱ्या मुलासह मोठ्या भावाचा मृत्यू झाला.

Chattisgarh Home Theatre Blast:छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यातील रेंगाखार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी झालेल्या होम थिएटर बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. होम थिएटर नैसर्गिकरित्या फुटले नसून, वधूच्या प्रियकराने त्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांसमोर सरजू मरकम (33) याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील छपला गावचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले.

एसपी लाल उमेंद सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, 30 मार्चला लग्नाच्या रात्री सरजू मरकाम याचा प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याशी फोनवरुन वाद झाला. बदला घेण्यासाठी आरोपीने होम थिएटरमध्ये अमोनियम नायट्रेट आणि सुतळी बॉम्बपासून बनवलेले दिड किलो स्फोटकं फिट केली. हे होम थिएटर त्याने प्रेयसीला लग्नात गिफ्ट केले. 

दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होतेनवविवाहित महिला आणि सरजू मरकम यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीचे लग्न ठरल्याने तो नाराज होता. मोबाईलवरुन नवऱ्या मुलाशी वाद झाल्यानंतर त्याने बदला घेण्यासाठीच हे कृत्य केले. आरोपीने ही स्फोटके कुठून आणली याचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान आरोपी सरजू मरकमने सांगितले की, तो यापूर्वी इंदूरच्या क्रशर प्लांटच्या (स्टोन क्रशर) ब्लास्टिंग विभागात काम करत होता. त्यामुळे त्याला आधीच स्फोटके आणि ब्लास्टिंगची माहिती होती.

प्रकरण काय?सोमवारी(3 एप्रिल) रेंगाखार पोलीस स्टेशन हद्दीतील चामारी गावातील घरात होम थिएटरचा स्फोट झाला. या स्फोटात एक नवविवाहित तरुण आणि त्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला. हा स्फोट इतका जोरदार होता की, ज्या खोलीत हे होम थिएटर ठेवण्यात आले होते त्या खोलीच्या भिंती कोसळल्या. हेमेंद्र मेरावी(22) आणि राजकुमार (30) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत, तर घरातील इतर चार जणही जखमी झाले आहेत.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBlastस्फोटPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट