हनीट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल; महिलेसह तिघांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 16:34 IST2021-06-09T16:12:06+5:302021-06-09T16:34:55+5:30
Honeytrap Case : या कलमातंर्गत आरोपींविरोधात दोष ठेवण्यात आला असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

हनीट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल; महिलेसह तिघांचा समावेश
अहमदनगर - श्रीमंत व्यवसायिकास शरीर संबंध करण्यास भाग पाडून त्याचे अश्लिल व्हिडीओ तयार करत लुटमार करून खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात नगर तालुका पोलिसांनी बुधवारी (दि.९) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. महिलेसह अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर) व बापू बन्सी सोनवणे (रा.हिंगणगाव ता. नगर) या तिघांविरोधात ८२ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शरीर सुखाचे अमिष दाखवून खंडणी मागणे, मारहाण,जबरी चोरी या कलमातंर्गत आरोपींविरोधात दोष ठेवण्यात आला असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महिलेने तिच्या साथीदारांशी संगनमत करून नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यवसायिकाला २६ एप्रिल रोजी तिच्या जखणगाव येथील बंगल्यात बोलविले. तेथे त्याला शरीर सबंध करण्यास भाग पाडले. यावेळी महिलेच्या साथीदारांनी अश्लिल व्हिडिओ चित्रिकरण केले. त्यानंतर सदर व्यवसायिकास आरोपींनी मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, सोन्याच्या चार अंगठ्या, ८४ हजार ३०० रुपये रोख असा एकूण ५ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. तसेच त्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
राज्यस्तरीय बॉक्सरची चाकू भोसकून हत्या; अल्पवयीन मुलीची छेडछाड रोखणं बेतलं जीवावरhttps://t.co/yn7aS8OIml
— Lokmat (@MiLOKMAT) June 9, 2021