Charged against Five men due to land dispute | जागेच्या वादातून तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल
जागेच्या वादातून तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : जागेच्या वादातून गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोकाटे वस्ती, बावधन येथे घडली.
याबाबत प्रविण रामचंद्र घुले (वय ३६, रा. बोपखेल) यांनी रविवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर बाळासाहेब तोडकर (रा. कोकाटे वस्ती, बावधन) व त्याचे चार साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी घुले हे बावधन येथील मानव सिटी स्पेसेस या बांधकाम साइटवर सुरक्षा रक्षकाचे प्रमुख आहेत. १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी तोडकर हा आपल्या साथीदारांसह बांधकाम साइटवर आला. ही जागा माझी आहे. तुम्ही येथे थांबू नका, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच प्रवेशद्वारावरील सीसीटिव्ही आणि लाईटच्या वायर कापून टाकल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: Charged against Five men due to land dispute
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.