चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र 

By रतींद्र नाईक | Published: October 20, 2023 11:16 PM2023-10-20T23:16:52+5:302023-10-20T23:17:07+5:30

चेतन सिंह चौधरी असे त्या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे.

Charge sheet against sacked constable for killing 4 persons in moving train | चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र 

चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र 

मुंबई : चालत्या ट्रेनमध्ये चार जणांची हत्या करणाऱ्या बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल विरोधात पोलिसांनी १२०६ पानांचे आरोपपत्र बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले. चेतन सिंह चौधरी असे त्या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे.

जयपूर मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस ने प्रवास करत असताना ३१ जुलै २०२३ रोजी आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासह चार जणांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचल्यानंतर मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चेतनसिंह चौधरी (३४) याला शस्त्रासह पकडण्यात आले. 

याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी चार्जशीट बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली हे आरोपपत्र सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहे तसेच आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात सादर केले जाणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Charge sheet against sacked constable for killing 4 persons in moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.