शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:18 IST

Changur Baba : छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचं नेटवर्क फक्त देशापुरतं मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलं होतं.

जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचं नेटवर्क फक्त देशापुरतं मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलं होतं. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात हे उघड झालं आहे. ईडीने मुंबई ते पनामापर्यंत पसरलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.

तपासात असं समोर आलं की, छांगुर बाबाला परदेशातून मोठं फंडिंग मिळालं होतं. या फंडिंगचा वापर देशातील लोकांचं धर्मांतर करण्यासाठी आणि बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात होता. छांगुर  बाबा आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या २२ बँक खात्यांच्या चौकशीत ईडीला तब्बल ६० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले आहेत. खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहारांची एक मोठी यादी सापडली आहे, ज्याचा सोर्स आणि उद्देश संशयास्पद आहे.

मुंबईत छांगुर बाबाने 'रुनवाल ग्रीन्स' नावाचं कॉम्प्लेक्स खरेदी केलं होतं. ईडीला संशय आहे की, हा व्यवहार बेकायदेशीर फंडिंगमधून मिळालेल्या पैशाने झाला होता. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. ईडीच्या तपासात असंही समोर आलं आहे की, छांगुर हा पनामा येथील 'लोगोस मरीन' नावाच्या कंपनीशी जोडलेला आहे. ईडीने या कंपनीचे कागदपत्रे आणि रेकॉर्ड ताब्यात घेतले आहेत, ज्यामुळे मनी लाँड्रिंगचं नेटवर्क परदेशातही चालवलं जात असल्याचा संशय निर्माण होतो.

"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश

ईडीने लखनौच्या सुभाष नगरमध्ये असलेल्या 'आस्वी बुटीक'चीही झडती घेतली आहे. तपासात असं दिसून आलं आहे की, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं लपविण्यासाठी हे बुटीक एक अड्डा बनवलं गेलं होतं. छांगुर बाबा आणि त्याच्या नेटवर्कशी संबंधित अनेक मालमत्तांची कागदपत्रं येथून जप्त करण्यात आली आहेत. सध्या बुटीक सील करण्यात आले आहे.

ईडीने आपल्या तपासात नवीन रोहरा आणि नीतू रोहरा उर्फ नसरीन यांनाही या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा महत्त्वाचा भाग मानलं आहे. हे दोघेही संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या व्यवहारात छांगुर बाबाला मदत करत होते. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. छांगुर  बाबा आणि त्याच्या नेटवर्कविरुद्ध ईडीकडे अनेक पुरावे आहेत. आता या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसा