मित्राच्या गर्लफ्रेंडचा MMS बनवला, मग शरीर संबंधाची मागणी; ऐकलं नाही म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 06:20 PM2022-10-16T18:20:50+5:302022-10-16T18:23:16+5:30

उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये कौशर नावाच्या तरुणानं आपल्याच मित्राच्या गर्लफ्रेंडचा एमएमएस रेकॉर्ड करुन त्या दोघांना ब्लॅकमेल केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

chandauli girlfriend being blackmailed by obscene mms not agree murdered with knife drinking alcohol | मित्राच्या गर्लफ्रेंडचा MMS बनवला, मग शरीर संबंधाची मागणी; ऐकलं नाही म्हणून...

मित्राच्या गर्लफ्रेंडचा MMS बनवला, मग शरीर संबंधाची मागणी; ऐकलं नाही म्हणून...

googlenewsNext

चंदौली-

उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये कौशर नावाच्या तरुणानं आपल्याच मित्राच्या गर्लफ्रेंडचा एमएमएस रेकॉर्ड करुन त्या दोघांना ब्लॅकमेल केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. कौशर याला त्याच्या मित्रांनी असं न करण्यासाठी समजावलं पण तरीही तो काही ऐकला नाही. त्यामुळे थेट त्याच्या हत्येचा कट रचला गेला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना धक्कादायक माहिती दिली आहे. 

कौशर याला आधी त्यांच्या मित्रांनी दारु पाजली. तो नशेत धूंद असताना त्याला शेतात नेलं आणि चाकूनं वार करत त्याची हत्या केली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळी चंदौलीच्या मुगलसराय कोतवाली हद्दीत मोहम्मदपूर गावात कौशर नावाच्या तरुणाचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली. कौशरच्या हत्येमागे त्याच्याच मित्रांचा हात असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशरचे मित्र शाहनवाज आणि शहाबुद्दीन त्याच्यासोबत गुरुवारी रात्री दिसले होते. याच माहितीच्या जोरावर पोलिसांनी दोघांना गाठलं. पोलीस खाक्या दाखवत दोघांची चौकशी करण्यात आली त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. 

कौशरनं रेकॉर्ड केला होता MMS
पोलिसांना चौकशीत माहिती मिळाली की कौशरनं गावातील शाहनवाज आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा एमएमएस रेकॉर्ड केला होता. याच आधारावरुन तो दोघांना ब्लॅकमेल करत होता. शाहनवाज आणि त्याचा मित्र शहाबुद्दीन यांनी कौशर याला सजमावण्याचा अनेदका प्रयत्न केला. पण तो काही ऐकला नाही. तो तरुणीला ब्लॅकमेल करु लागला आणि तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करू लागला होता. याच रागातून शाहनवाज आणि त्याचा मित्र शहाबुद्दीन या दोघांनी मिळून कौशरच्या हत्येचा कट रचला.

दारु पाजली अन् शेतात नेऊन केली हत्या
कौशर, शाहनवाज आणि शहाबुद्दीन या तिघांनी एकत्र बसून मद्यपान केलं. कौशर दारुच्या नशेच बेधुंद झाल्यानंतर त्याला शाहनवाज आणि शहाबुद्दीन यांनी शेताच्या दिशेनं नेलं. शेतात त्याच्यावर चाकूनं वार करत त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी शाहनवाज आणि शहाबुद्दीन यांना अटक करुन तुरुंगात डांबलं आहे.

Web Title: chandauli girlfriend being blackmailed by obscene mms not agree murdered with knife drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.