नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे सोनसाखळी चोर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:14 IST2019-08-07T15:10:41+5:302019-08-07T15:14:04+5:30

एका दक्ष नागरिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Chain snatcher arrested due to citizen's alertness | नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे सोनसाखळी चोर गजाआड

नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे सोनसाखळी चोर गजाआड

ठळक मुद्देसचिन खांडेकर असे या चोरट्याने नाव असून तो सातारा जिल्ह्याचा राहणार आहे.खांडेकरविरोधात याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण - पश्चिमेकडील उल्हासनदीच्या पुलावरून जात असताना एका तरुणीची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला एका दक्ष नागरिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सचिन खांडेकर असे या चोरट्याने नाव असून तो सातारा जिल्ह्याचा राहणार आहे.
मोहने येथे राहणारे रवी गायकवाड हे काल सायंकाळी कल्याणहून मोहने येथे घराच्या दिशेने जात होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या शेजारील रस्त्याने माय लेकी जात होत्या. पाठीमागून येणाऱ्या एका तरुणाने मुलीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. दोघींनी आरडाओरड करताच रवी गायकवाड यांचे लक्ष गेले. त्यांनी दुचाकीने अर्धा किलोमीटर या चोरट्याचा पाठलाग करत या चोरट्याला धडक दिली चोरटा खाली पडताच रवी यांनी एका इमारतीच्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने चोरट्यावर झडप घालत त्याला पकडले. त्यानंतर नागरिकांनी धाव घेत चोरट्याला चोप देत महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या चोरट्याकडून चैन हस्तगत करण्यात आली आहे. खांडेकरविरोधात याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Chain snatcher arrested due to citizen's alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.