मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 18:50 IST2020-01-20T18:48:17+5:302020-01-20T18:50:02+5:30

संशयित व्यक्ती आणि रिक्षाचे छायाचित्र जाहीर करण्यात आले आहे. 

CCTV detained for carrying explosives at Mangaluru Airport | मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद

मंगळुरु विमानतळावर स्फोटकाची बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद

ठळक मुद्दे संशयित व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

कर्नाटक - मंगळुरु विमानतळाच्या तिकिट काउंटरजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग आज सापडली असून खळबळ माजली होती. सीआयएसएफचे डीआयजी अनिल पांडे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित व्यक्ती आणि रिक्षाचे छायाचित्र जाहीर करण्यात आले आहे. 

संशयित व्यक्ती स्पोटकांची बॅग मंगळुरु विमानतळाच्या तिकीट काउंटरजवळ ठेवून रिक्षाने जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. तपास यंत्रणा संशयित रिक्षा आणि व्यक्तीचा शोध घेत आहेत. आयईडीसारखे स्फोटकं असलेली बॅग सापडली असून बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

Web Title: CCTV detained for carrying explosives at Mangaluru Airport