शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

बनावट कागदपत्रे देऊन SBI सोबत 14 कोटींची फसवणूक, CBI कडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 9:20 AM

SBI : फसवणूक केल्याप्रकरणी बंगळुरू येथील बायोफ्यूल कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे

नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (CBI) स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंगळुरू येथील बायोफ्यूल कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, अंकित बायोफ्यूल्स एलएलपीने ऑगस्ट 2015 मध्ये 15 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राजाजी नगर शाखेशी संपर्क केला होता. त्यावेळी बायोमासपासून ब्रिकेट्स आणि पेलेट्स तयार करण्यासाठी आणि कर्नाटकातील तुमाकुरू येथे प्लांट आणि यंत्रसामग्री उभारण्यासाठी कंपनीकडून आर्थिक मदत मागितली होती.

याप्रकरणी सीबीआयने अंकित बायोफ्यूल्स एलएलपी, तसेच, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी. आराध्या, माजी प्रवर्तक के. व्यंकटेश, सध्याचे भागीदार  जे हलेश, अरुण डी. कुलकर्णी, जी. पुलम राजू, के. सुब्बा राजू, थिरुमलैया थिमप्पा आणि अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांना आरोपी ठरविले आहे. दरम्यान, तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात जी. पुलम राजू आणि के. सुब्बा राजू जी यांच्या मालकीची 56 एकर आणि 36 गुंठे जमीन गहाण ठेवल्यानंतर संपार्श्विक सुरक्षेच्या (collateral security) विरोधात बँकद्वारे मर्यादा मंजूर केली होती. बँकेने 19 नोव्हेंबर 2015 रोजी कर्ज वितरीत केले, परंतु न भरल्यामुळे, 28 जून 2017 रोजी खात्याचे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून वर्गीकरण करण्यात आले.

कंपनीच्या विरोधात काय आहे आरोप? बँकेने केलेल्या अंतर्गत तपासात असे दिसून आले आहे की, गहाण ठेवलेली मालमत्ता केवळ जी. पुलम राजू आणि के. सुब्बा राजू यांच्या नावावर नव्हती आणि काही प्रमाणात त्यांच्याकडे जमिनीची मालकी होती. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवण्यासाठी जामीनदारांनी कोणत्याही सीमांकन केलेल्या जमिनीच्या नोंदीशिवाय बनावट पट्टा-पासबुक (टायटल बुक) सादर केल्याचे पुढे उघड झाले. हीच मालमत्ता आयएफसी व्हेंचर कॅपिटल फंड लिमिटेडकडे गहाण ठेवल्याचेही अंतर्गत तपासातून समोर आले आहे.

याचबरोबर, अंकित बायोफ्यूल्स एलएलपी आणि त्याच्या भागीदारांनी जामीनदारांसह अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांसोबत कट रचला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 15 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी गहाण ठेवलेल्या मालमत्तेशी संबंधित बनावट कागदपत्रे सादर केली, असा आरोप सीबीआयच्या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, अंकित बायोफ्यूल्स एलएलपीच्या भागीदारांनी प्लँट आणि मशिनरी उभारण्यासाठी बँकेने मंजूर केलेला आणि वितरित केलेला सार्वजनिक पैसा वळवला आणि पळवून नेल्याचा आरोप आहे आणि त्याद्वारे बँकेची फसवणूक केली आणि 28 जून 2017 पासून व्याजासह 14.41 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाCBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारी